दोघांचंही एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं.त्यांच्या नात्यातील गोडवा आणि आपुलकी ही काही नवरा बायको पेक्षा नक्कीच कमी नव्हती.स्वतःच्या हातानी बनवलेलं जेवण आपल्या प्रियकराला जेऊ घालणे यात तिला जाम मजा यायची.प्रत्येक क्षण ते अगदी फार आनंदाने जगायचे.कॉलेज ची लाईफ हवी तशी त्यांनी सोबत जगून एक चापटर पूर्ण झाला होता.तिच्या मनात शिक्षण झाल्यावर जॉब मिळवणे एवढंच ध्येय आता ती धरून होती.परंतु जॉब हा बाहेर शहरात जाऊनच तिला मिळणार होता.तिने प्रयत्न करून जॉब मिळवला व आपल्या आयुष्यात एक रुटीन बनून ती जॉब आणि आपल्या प्रेमाच्या गुंताऱ्यात गुंतून गेली.
एकाच शहरात दोघे राहत होते.तो फार मदत करायचा तिची.सावली बनला होता तो.प्रत्येक मुलीला वाटते की आपला प्रियकर आपल्या नेहमी जवळ आणि मनाच्या गाभाऱ्यात तो कायम असायला पाहिजे.असच स्थान तिच्या प्रियकराच होत.आपल्या प्रियकराचा बर्थडे फार भारी सेलिब्रेट करायचा हा उन्माद तिच्या मनात होता.पूर्ण घर तिने अगदी हवं तसं सजवून घेतलं होतं.हो सजवणारच कारण तो जीव होता तिचा.मनाच्या अगदी जवळ असणारा तिचा बाबू होता.त्यालाही खूप बरं वाटलं असेल तेव्हा हे नक्कीच.
हीच प्रेम हे सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील चित्रपटांच्या कथांसारखं होत हे म्हणण्यास काही वावग ठरणार नाही.त्यावेळच्या हिट गाण्यातील एक गाणं म्हणजे’तू जहाँ जहाँ चलेंगा,मेरा साया साथ होगा’.अगदी याच गाण्याप्रमाणे तिचंही प्रेम होतं.अगदी त्याच्या छोट्या छोट्या अडचणी मध्ये पण आणि त्याच्या प्रत्येक सुख दुखात सोबत म्हणून तिची सावली त्याच्याबरोबर होती.अरे का नाही असणार?कारण तो जीव होता तिचा.खूप खूप प्यांपर करायची त्याला आणि नात्याला.आपल्या प्रेमाला उतरती कळा लागू नये म्हणून बरीच प्रयत्नशील राहायची ती.असच सगळी काही सरळ चालू होतं.आणि अचानक एके दिवशी त्यांच्या मध्ये वाद झालेत ते पण अगदी क्षुल्लक गोष्टीवरून.तसे वाद विवाद हे प्रत्येक नात्यात होत राहतात आणि व्हायला पाहिजे.कारण त्यातील गोडवा आणि नात्याची जाणीव जास्त प्रगल्भ होते.म्हणून ते असायला हवेत.परंतु त्याची पण एक मर्यादा ही नक्कीच असते.सत्याच्या तळाशी आणि वास्तवाच्या मुळाशी जाऊन आपण त्याच समाधान जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत भांडणाचे समाधान हे होऊ शकत नाही. त्याची प्रचंड प्रमाणात चिडचिड होत होती.सगळं काही नीट असताना हे अस का घडत आहे म्हणून ती पण फारच डिप्रेशनमध्ये गेली.आपला प्रियकर असा का करत आहे किंवा आपल्या कडून असे काय झाले असे असंख्य प्रश्न तिचं मनात उभे राहत होते.तिची झोपच उडाली होती.सततची चिडचिड आणि सततची भांडण यामुळे तो हैराण होऊन सतत ब्रेकअपच्या गोष्टी करत होता.मला आता तुझ्याशी नात नाही ठेवायचं,तू मला खुश नाही ठेऊ शकत, वगैरे वगैरे अशी बरीचशी कारण सांगून त्यानं ब्रेकअप केलं व तिच्या मनात अणुबॉम्ब फुटल्या सारखा अनुभव ती करत होती.सगळं काही संपलं आता,आपलं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखा भास तिला व्हायला लागला.ती त्याची शांतपणे समजूत काढत होती.नात टिकवण्यासाठी गयावया करू लागली.तिच्याबद्दल त्याला जणू आता फिलिंग्ज राहिल्याच नव्हत्या.तिलाच दोष देऊन तिला पजेसिव्ह ठरवून तो रिकामा झाला होता.एक झटक्यात गिल्ट त्याने तिच्यावर ढकलून दिल होत.तिच्याशी सगळे संबंध तोडले.तिला हे सहन होण्यापलीकडे होत.एक क्षणात माणूस नात्यातून बाहेर पडतो,जाताना आपल्यालाच दोष देतो आणि लगेच आनंदात नवीन आयुष्य जगू लागतो यावर तिचा विश्वास बसेना.कधी कधी वाटत होतं त्याला नात संपवायचं आहे परंतु त्याला फक्त निमित्त हवं होतं.परंतु कधी कधी विचार येतो,स्वतःच्या कम्फर्टनुसार माणसे जोडणारी,तोडणारी,फायद्यासाठी,सुखासाठी वापर करून घेणारी लोक असतात तर मग याला प्रेम म्हणता येईल का?नक्कीच हे प्रेम नाही.नात तुटल्यानंतर काय वेदना होतात,मनाचा काय जळफळाट होतो हे तिला आता चांगलंच कळलं होतं.रात्रंदिवस फक्त उशी घेऊन अश्रू ढाळत बसने आणि त्याच्या आठवणीत गुंतून जाणे एवढंच तिच्या आयुष्यात ते शिल्लक राहिल होत.अशी प्रेयसी मिळणे आजच्या दिवसात तरी कठीण आहे.पण ती त्याला मिळाली होती.परंत प्रत्येकाच्या अपेक्षा असतात एकमेकांकडून.परंतु प्रत्येक वेळी प्रियकर किंवा प्रेयसी ती पूर्णच करणार अस नाही होऊ शकत.कधी कधी ते आपल्या अवाक्याच्या बाहेर राहते.म्हणून सरळ नातच तोडून टाकायचं एवढ्या टोकाचा निर्णय अगदी सहजरीत्या घेऊन मोकळं होणे हे प्रेमाला नक्कीच शोभण्यासारखं नाही.
ती आजही त्याच्या आठवणीत आपली उशी अश्रूंनीं भिजून काढत आहे.आजही त्याच्या परत येण्याच्या आशेने ती त्याच्याकडे बघत आहे.तो येईल की नाही या विचारांचं कालवा कालव तिच्या मनात सतत चालु राहते.परंतु आशावादी विचार ठेऊन परमेश्वराला एकच मागणी रोज घालते ती की त्याला परत येऊ दे.
म्हणून आता त्यानेही एक पाऊल पुढे येऊन आपल्या प्रेयसी ला भेटून सर्व अडचणी,इगो,स्वाभिमान विसरून एक घट्ट मिठीत घेऊन “आय लव्ह यु सो मच मय जान”हा प्रेमाचा शब्द अगदी प्रेमाने बोलावा.एक पूर्णपणे आलिंगन देऊन प्रेमाच्या चुम्बनात दोघांनी हरवून जावे.आणि एक नवीन सुरवात करत आपलं प्रेम,आपलं नात यशस्वी करावं.
ती आजही एकच शब्द म्हणते”ये रे माझ्या राजा,जीव आहेस तू माझा”.😘😘🌹🌹