आपला भारत देश हा तरुणांच्या कौशल्यावर प्रगतिशील आहे.बराचसा तरुण वर्ग हा आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज धडपड करत आहे.कोणी स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करतो,कोणी डॉक्टर,इंजिनिअर,व्यावसायिक तर कोणी वकील,जज इत्यादी असे बऱ्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.परंतु या वाटचालीत त्याला बऱ्याच अपयशांना सामोरं जावं लागतं,कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हवं ते यश मिळत नाही.अशा अपयशातून नैराश्य,आत्महत्या सारखे विचार,खचून जाणे व आपले स्वप्न अर्ध्यात सोडून निराश होऊन आपल्या इच्छा आकांक्षा यांचा बळी दिला जातो.
मला त्या सर्व तरुण वर्गाला एक जाणीव करून द्यायची आहे की जर अपल्याला इच्छुक यश मिळत नसेल तर त्याचा दोष नशिबाला न देता आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहेत हे लक्षात ठेवायला हवं.निश्चित यश हवं असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करायला हवा.प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा अनुकूल यश आपल्या पराक्रमाने महाराजांनी मिळवलं.योजना,नियोजन,योग्य दिशा व उद्दिष्ट काय आहे हे सगळं जाणून त्यानुसार आपली पावलं त्या दिशेने महाराजांनी उचलली.निश्चित यश मिळवायचं असेल तर आपल्याला शिवचरित्र वाचन गरजेचे आहे त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे.प्रयत्न काय असतात हे बाजी प्रभूंची घोडखिंडीतील लढाई वाचल्यावर लक्षात येईल.फक्त सहाशे मावळे घेऊन बाजी प्रभू महाराजांना म्हणतात”राजे आपण निघा,हा बाजी प्रभू इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत शत्रू ला एक पाऊलही पुढे सरकू देणार नाही,राजे हा आपला बाजी स्वतःच्या छातीचा पर्वत बनून शत्रूच्या पुढे उभा राहील.”कुठे सिद्धी जोहर चा प्रचंड सेना समुद्र व कुठे बाजींचे फक्त सहाशे मावळे?परंतु तरीही प्राणपणाने लढून आपल्या महाराजांसाठी,स्वराज्याच्या सुर्यासाठी बाजी व त्यांचे थोरले बंधू फुलाजी लढतात.महाराज विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचा आवाज होईपर्यंत प्रचंड आणि अफाट शौर्य दाखवून बाजी आपली प्राणज्योत शांत करतात.यश मिळवायचं असेल तर आपल्या कुवतीपेक्षा जास्त प्रयत्न आपले हवेत तेव्हाच यश आपल्या पदरात पडणार.बाजींचे हे शौर्य तो पराक्रम हा त्यांच्या कुवतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.व महाराजांप्रति असलेली निष्ठा व स्वराज्याची अस्मिता लक्षात ठेवून बाजींनी आपले प्राण अर्पण केले.आपलीही आपल्या उद्देशाकरिता तशी निष्ठा असायला हवी.तरच आपण यशाचं शिखर गाठू शकतो.असे कितीतरी उदाहरण,कितीतरी पराक्रम आपल्या शिवचरित्रात दिसतील.प्रत्येक पराक्रम हा कुवतीपेक्षा जास्तच होता.लाल महालातील एक लाख सैन्य असलेल्या शाहिस्तेखानाच्या महालात फक्त आणि फक्त शंभर मावळे घेऊन मारलेला छापा ते शाहिस्तेखानची बोटे तोडण्यापर्यंतचा पराक्रम हा काही साधा नाही.कुठे कोंडाजी फर्जंदचे फक्त साठ मावळे व कुठे मुघलांचा सेना सागर तरीही पन्हाळा कोंडाजींनी जिंकलाच.कोणी पण या असल्या पराक्रमाला वेडेपणा म्हणेल परंतु या वेडेपणातून तर या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत.या वेडेपणातून स्वराज्याच स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.हा असला वेडेपणा असेल तर आपण कुठलंही यश गाठू शकतो.फक्त तो वेडेपणा सत्याचा असायला हवा,सत्कारणी असायला हवा व महाराजां सारखे प्रयत्न व नियोजन असायला हवं तरच आपण कीर्ती करू शकतो.
मित्रांनो आपले प्रयत्न हे जास्तच असू द्या.प्रमाणापेक्षा जास्त प्रयत्न हेच तुमच्या यशाचं गुपित असणार आहे.उद्या आपल्याला अशी म्हणायची पाळी येऊच नका देऊ की”अरे आपण थोडं आणखी अभ्यास केला असता,थोडे आणखी प्रयत्न केले असते तर आज परिणाम हे काही वेगळेच असते”.अशी वेळ येऊ देऊ नका,प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना आपले आदर्श मानून त्या दिशेने प्रयत्नशील राहा.शिवचरित्र अभ्यासा त्यातून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल.कधीही निराश न होता सकारात्मक विचार करून हळू हळू प्रगती करत राहा.
यश तुमची वाट पाहत असेल म्हणून चला कामाला लागा.
जय शिवराय जय शंभूराजें🙏
शुभम सिरसाठ,अमरावती
९४०५३०१६१४
जीव होता तो तिचा
दोघांचंही एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं.त्यांच्या नात्यातील गोडवा आणि आपुलकी ही काही नवरा बायको पेक्षा नक्कीच कमी नव्हती.स्वतःच्या हातानी बनवलेलं जेवण आपल्या प्रियकराला जेऊ घालणे यात तिला जाम मजा यायची.प्रत्येक क्षण ते अगदी फार आनंदाने जगायचे.कॉलेज ची लाईफ हवी तशी त्यांनी सोबत जगून एक चापटर पूर्ण झाला होता.तिच्या मनात शिक्षण झाल्यावर जॉब मिळवणे एवढंच ध्येय आता ती धरून होती.परंतु जॉब हा बाहेर शहरात जाऊनच तिला मिळणार होता.तिने प्रयत्न करून जॉब मिळवला व आपल्या आयुष्यात एक रुटीन बनून ती जॉब आणि आपल्या प्रेमाच्या गुंताऱ्यात गुंतून गेली.
एकाच शहरात दोघे राहत होते.तो फार मदत करायचा तिची.सावली बनला होता तो.प्रत्येक मुलीला वाटते की आपला प्रियकर आपल्या नेहमी जवळ आणि मनाच्या गाभाऱ्यात तो कायम असायला पाहिजे.असच स्थान तिच्या प्रियकराच होत.आपल्या प्रियकराचा बर्थडे फार भारी सेलिब्रेट करायचा हा उन्माद तिच्या मनात होता.पूर्ण घर तिने अगदी हवं तसं सजवून घेतलं होतं.हो सजवणारच कारण तो जीव होता तिचा.मनाच्या अगदी जवळ असणारा तिचा बाबू होता.त्यालाही खूप बरं वाटलं असेल तेव्हा हे नक्कीच.
हीच प्रेम हे सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील चित्रपटांच्या कथांसारखं होत हे म्हणण्यास काही वावग ठरणार नाही.त्यावेळच्या हिट गाण्यातील एक गाणं म्हणजे’तू जहाँ जहाँ चलेंगा,मेरा साया साथ होगा’.अगदी याच गाण्याप्रमाणे तिचंही प्रेम होतं.अगदी त्याच्या छोट्या छोट्या अडचणी मध्ये पण आणि त्याच्या प्रत्येक सुख दुखात सोबत म्हणून तिची सावली त्याच्याबरोबर होती.अरे का नाही असणार?कारण तो जीव होता तिचा.खूप खूप प्यांपर करायची त्याला आणि नात्याला.आपल्या प्रेमाला उतरती कळा लागू नये म्हणून बरीच प्रयत्नशील राहायची ती.असच सगळी काही सरळ चालू होतं.आणि अचानक एके दिवशी त्यांच्या मध्ये वाद झालेत ते पण अगदी क्षुल्लक गोष्टीवरून.तसे वाद विवाद हे प्रत्येक नात्यात होत राहतात आणि व्हायला पाहिजे.कारण त्यातील गोडवा आणि नात्याची जाणीव जास्त प्रगल्भ होते.म्हणून ते असायला हवेत.परंतु त्याची पण एक मर्यादा ही नक्कीच असते.सत्याच्या तळाशी आणि वास्तवाच्या मुळाशी जाऊन आपण त्याच समाधान जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत भांडणाचे समाधान हे होऊ शकत नाही. त्याची प्रचंड प्रमाणात चिडचिड होत होती.सगळं काही नीट असताना हे अस का घडत आहे म्हणून ती पण फारच डिप्रेशनमध्ये गेली.आपला प्रियकर असा का करत आहे किंवा आपल्या कडून असे काय झाले असे असंख्य प्रश्न तिचं मनात उभे राहत होते.तिची झोपच उडाली होती.सततची चिडचिड आणि सततची भांडण यामुळे तो हैराण होऊन सतत ब्रेकअपच्या गोष्टी करत होता.मला आता तुझ्याशी नात नाही ठेवायचं,तू मला खुश नाही ठेऊ शकत, वगैरे वगैरे अशी बरीचशी कारण सांगून त्यानं ब्रेकअप केलं व तिच्या मनात अणुबॉम्ब फुटल्या सारखा अनुभव ती करत होती.सगळं काही संपलं आता,आपलं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखा भास तिला व्हायला लागला.ती त्याची शांतपणे समजूत काढत होती.नात टिकवण्यासाठी गयावया करू लागली.तिच्याबद्दल त्याला जणू आता फिलिंग्ज राहिल्याच नव्हत्या.तिलाच दोष देऊन तिला पजेसिव्ह ठरवून तो रिकामा झाला होता.एक झटक्यात गिल्ट त्याने तिच्यावर ढकलून दिल होत.तिच्याशी सगळे संबंध तोडले.तिला हे सहन होण्यापलीकडे होत.एक क्षणात माणूस नात्यातून बाहेर पडतो,जाताना आपल्यालाच दोष देतो आणि लगेच आनंदात नवीन आयुष्य जगू लागतो यावर तिचा विश्वास बसेना.कधी कधी वाटत होतं त्याला नात संपवायचं आहे परंतु त्याला फक्त निमित्त हवं होतं.परंतु कधी कधी विचार येतो,स्वतःच्या कम्फर्टनुसार माणसे जोडणारी,तोडणारी,फायद्यासाठी,सुखासाठी वापर करून घेणारी लोक असतात तर मग याला प्रेम म्हणता येईल का?नक्कीच हे प्रेम नाही.नात तुटल्यानंतर काय वेदना होतात,मनाचा काय जळफळाट होतो हे तिला आता चांगलंच कळलं होतं.रात्रंदिवस फक्त उशी घेऊन अश्रू ढाळत बसने आणि त्याच्या आठवणीत गुंतून जाणे एवढंच तिच्या आयुष्यात ते शिल्लक राहिल होत.अशी प्रेयसी मिळणे आजच्या दिवसात तरी कठीण आहे.पण ती त्याला मिळाली होती.परंत प्रत्येकाच्या अपेक्षा असतात एकमेकांकडून.परंतु प्रत्येक वेळी प्रियकर किंवा प्रेयसी ती पूर्णच करणार अस नाही होऊ शकत.कधी कधी ते आपल्या अवाक्याच्या बाहेर राहते.म्हणून सरळ नातच तोडून टाकायचं एवढ्या टोकाचा निर्णय अगदी सहजरीत्या घेऊन मोकळं होणे हे प्रेमाला नक्कीच शोभण्यासारखं नाही.
ती आजही त्याच्या आठवणीत आपली उशी अश्रूंनीं भिजून काढत आहे.आजही त्याच्या परत येण्याच्या आशेने ती त्याच्याकडे बघत आहे.तो येईल की नाही या विचारांचं कालवा कालव तिच्या मनात सतत चालु राहते.परंतु आशावादी विचार ठेऊन परमेश्वराला एकच मागणी रोज घालते ती की त्याला परत येऊ दे.
म्हणून आता त्यानेही एक पाऊल पुढे येऊन आपल्या प्रेयसी ला भेटून सर्व अडचणी,इगो,स्वाभिमान विसरून एक घट्ट मिठीत घेऊन “आय लव्ह यु सो मच मय जान”हा प्रेमाचा शब्द अगदी प्रेमाने बोलावा.एक पूर्णपणे आलिंगन देऊन प्रेमाच्या चुम्बनात दोघांनी हरवून जावे.आणि एक नवीन सुरवात करत आपलं प्रेम,आपलं नात यशस्वी करावं.
ती आजही एकच शब्द म्हणते”ये रे माझ्या राजा,जीव आहेस तू माझा”.😘😘🌹🌹
नेहा आणि मी#1
पहिली भेट##@पॅराडाईज कॅफे…..
नेहा आणि मी त्या दिवशी पहिल्यांदा भेटणार होतो.फेसबुक ची मैत्री म्हटल्यावर मुली एका अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवत नाही ही तेवढीच वास्तविक गोष्ट आहे.सुरवातीला फेसबुक वर हॅलो आणि हाय शिवाय इतर फॉर्मलिटीज म्हणून बोलत असायचो.त्यामुळे फारसा एकमेकांना समजून आणि जाणून घ्यायचा वेळ कधी मिळाला नाही.हळूहळू मी पण कामात व्यस्त राहायला लागलो आणि तस पण फेसबुक ला जास्त ऑनलाइन राहणं मी आधीपासूनच टाळत असायचो.मग अचानक एक दिवस तिचाच मेसेज आला.
‘हे शुभम कुठे आहेस?
मी लॅब मध्ये आहे.मी तात्काळ रिप्लाय दिला कारण कॉम्प्युटर वर बसून टाईमपास चालू होता फक्त.
मी म्हटलं बोल न काय म्हणत होतीस?
अरे काही नाही टूरवर जायचं ठरवत आहोत आम्ही म्हणून तू पण आम्हाला जॉईन कर म्हणत होते.
मला तर आंनद झाला होताच की बया स्वतःहून विचारणा घालत आहे म्हणून.परंतु माझं त्यांच्यासोबत जाण शक्य नव्हतं.
मी तिला सांगितले कि’अग आता ऑडिट आहे त्यामुळे सर्व रिपोर्टिंग आणि डेटा मला तयार करावा लागणार आहे माझं शक्य नाही आता.’ती पण मान्य झाली.कारण ती पण एक सॉफ्टवेअर कंपनी मध्ये एम्प्लॉई होती.त्यामुळे ऑफिस मधील झंझटी काही तिच्यापासून अनोळखी नव्हत्या. तू ये टूरवर जाऊन आपण निवांत भेटुयात तू परत आल्यावर.
हो नक्की आपण भेटुयात आल्यावर असा रिप्लाय तिने पटकन देऊनही टाकला.
मी चाट क्लोजिंग करत म्हणालो
ओके देन, सी यु बाय बाय.
एक आठवडा झाला असेल आमच्या काही संवाद नव्हता.
नंतर तिचा मेसेज आला हे शुभम आपण भेटुयात का?मी पण हो म्हणून दिल.
ओके तुझा नंबर पाठव,
मी माझा नंबर तिला पाठवला व काही क्षणात तिचा व्हाटसएपला मेसेज आला.
हाय…नेहा here
हाय नेहा.
तर कधी भेटायचं आपण?फ्रायडे ला भेटलं तर चालेल का तुला?
मी हो म्हटलं सायंकाळी पाच वाजता विमान नगर ला फिनिक्स मॉल ला भेटायचं आम्ही ठरवलं.
ठरल्याप्रमाणे मी सायंकाळी फिनिक्स मॉल च्या एन्ट्री गेट ला जाऊन थांबलो आणि तिला फोन केला.
हाय नेहा,मी आलो आहे इथे.
अरे हो मी दोन मिनिटं मध्ये तुझ्या जवळ पोहोचते आहे.
थोड्याच वेळात ती समोरून येताना दिसली.
किती छान दिसत होती ती.
मानेवर रुळणारे मोकळे केस,कोरीव भुवया,काळेभोर आणि पाणीदार डोळे,त्यावर उघडझाप होणाऱ्या दाट पापण्या,अगदी धनुष्यालाही लाजवतील असे ओठ आय हाय…..अशी सगळी सामुग्री घेऊन आली होती ती.
काहीही म्हणा फेसबुक चे फोटो आणि खरा माणूस यातले अद्वितीय काय आहे हे भेटल्या शिवाय समजत नाही.तिथून लगेच आम्ही पराडाईज कॅफे मध्ये गेलो.काचेचा दरवाजा उघडून ती आत गेली तसा तिच्या परफ्यूम चा सुगंध मला वेडा करत होता.मनात म्हटलं परफ्यूम चे सेलेक्शन खूप भारी आहे हिचे.आतमध्ये गेल्यावर मेन्यू कार्ड घेऊन काय घेणार आहेस विचारले असता मी फक्त कॉफी सांगितलं व तिने कॅपॅचिनो ची ऑर्डर केली.माझी प्रचंड नर्वसनेस बघून तिने बोलायला सुरुवात केली.कस चालू आहे काम?
मी म्हटलं अगदी मस्त.असच हळूहळू आमचा संवाद वाढत गेला व माझा नर्वसनेस कुठच्या कुठे पळून गेला ते कळलेही नाही.
खरतर मी त्यादिवशी खूप अनकंफर्टेबल फील करत होतो.कुठल्या तरी मुलीला जाऊन भेटणे,ते पण फेसबुक मैत्रीण. जिच्याशी आपला संवाद नसतो,ओळख नसते,अशा मुलीशी भेटायला जाणे आणि भेटून गप्पा मारणे हे खरंतर प्रचंडच होत माझ्यासाठी.
कॉफी घेऊन झाल्यावर थोडा वेळ आम्ही गप्पा मारून निघायचे ठरवले.ती बिल द्यायला काऊंटरवर गेली.
अग थांब थांब काय करत आहेस?
मी देतोय न बिल.
असू दे त्यात काय एवढं?राहू दे देते मी म्हणून तिने मला दूर लोटलं.
बाहेर निघून आता निरोप घ्यायची वेळ आली होती.आम्ही पुढचा प्लॅन डिस्कस केला व आपल्या आपल्या गाडीकडे निघालो…….
शुभुलिहितो.कॉम
अतीत
त्या दिवशी दोन मनांच मनोमिलन जुळून येणार होते.अमरावती च्या कॉलेज मध्ये एक नवीन चाप्टर ला सुरुवात होणार होती.नकुल आणि नेहा हे पहिल्यांदाच एकमेकांना भेटणार होते. दोघांच्याही मनात तशी कल्पना पण नसेल कि आपल्या जीवनाला इथून नवी कलाटणी बसणार म्हणून.
एकाच क्लास मध्ये असल्यामुळे त्या दोन मनांच मिलन हे घडून येणारच होत.तस तर आपण खूप लोकांना रोज भेटतो,खूप साऱ्या सुंदर मुलींना पण भेटतो किंवा पाहतो,आणि मुलींना पण रोज कितीतरी मूल भेटतही असतील आणि पहातही असतील.परंतु ते म्हणतात जोडीया उपर वाले की मर्जी से ही बनके आती है.नकुल आणि नेहा ची जोडी पण परमेश्वराने बनवली अस म्हणण्यात काही वावग ठरणार नाही.त्यांच्या मिलनाचा योगायोग हा कॉलेज चा होता.परीक्षेच्या दिवशी एकमेकांची ओळख पटली होती.त्यांच्यामध्ये ओळख करून द्यायला कोणाची मध्यस्थी हे एक विशेष.त्याला तिच्याशीच का बोलावं वाटलं हे मात्र देव जाणे,कारण कॉलेज च्या कॅम्पस मध्ये मधमाश्यांच्या पोळ्यासारख्या मुली असताना हा तिच्याकडेच आकर्षित झाला याच नवल वाटायला हवं.नेहा ही दिसायला सुंदर आहेच.तिचा तो गोरा गोरा चेहरा,मोठमोठे चेहऱ्याला शोभतील असे मृगनयनी डोळे,बदामी लाल लाल ओठ,पातळ नाक,व नाकाचा फुगलेला शेंडा हा तिच्या सौन्दर्यात वेगळीच भर घालत होता.एवढं सगळं सौंदर्य असूनही देवाने तिला अगदी साधी राहणीमान प्रदान केले आहे.त्यामुळे तिला बघून माझ्या नकुल ची विकेट तर नो बॉल वर पण जाणार च होती.तीच ते साध्य सरळ सौंदर्य बघून तो लोहचुंबकप्रमाणे तिच्याकडे खेचला गेला होता.नजरेला नजर भिडली गेली होती.काही क्षण तर दोघांनाही बोलायसाठी काही शब्दच फुटत नव्हते.तसेच एकमेकांकडे बघत ते हरवून गेले होते.भानावर आले तेव्हा नकुल ने सुरवात केली.तो पण थोडा गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याशी बोलत होता.दोघांनी एकमेकांना आपला इन्ट्रो दिला व एक नवीन प्रवासात दोघेही सरसावू लागले.या नवीन प्रवासाची सुरवात तर झाली होती परंतु नकुल आणि नेहा ला प्रवासाचे शेवटचे ठिकाण काय असणार हे माहीत नव्हते,ते त्यांनाच ठरवावं लागणार होतं.रोज भेट होत होती व तिलाही आता नकुल ची सोबत हवीहवीशी वाटायला लागली होती.भेटल्यावर गप्पांची सुरवात व्हायची.त्यावेळेस ते एकमेकांत हरवून जायचे.दोघांना एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटायला लागली होती.ती बाहेर गावाला राहायची त्यामुळे कॉलेज ला पण रेग्युलर नव्हती तेव्हा त्यांची भेट ही कधितरी होत होती.ती परीक्षेच्या दिवशी आली की त्यांची भेट होत होती.नकुल ला भेटली की अस वाटायचं की आमच्या पठ्ठयाने खूप मोठा वनवास संपवला असा तो उत्साही आणि आनंदी तिला भेटायच्या दिवशी असायचा.ती भेटणार आहे त्या दिवशी तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपवता लपवल्या जात नव्हता.एक वेगळीच चमक त्याच्या चेहऱ्यावर असायची.भेटले की कुठेतरी एखाद्या कॅफेमध्ये बसायची इच्छा कुणालाही करणार तशी यांनाही होतीच आणि बसून मनसोक्त गप्पा मारायच्या.गोष्टी शेयर करायच्या,मन मोकळे करायचे असे कार्यक्रम त्यांचे चालायचे.गेली सात आठ महिने यांचं हे असंच चालत होत.कधीतरी भेटणे,फोनवर खूप वेळ बोलणे व बोलता बोलताच एकमेकात हरवून जाणे हे यांच्यासाठी एक सवयच बनली होती.नकुलच्या मनातही एक उत्सुकता होती आणि नेहा च्या पण.नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात ते अडकले होते.ती खुल्या मनाने ही गोष्ट बोलत नव्हती व नकुल ला पण तिला गमवायची इच्छा नव्हती.त्याची अवस्था तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच झाली होती.प्रपोज करायचा तर कसा आणि काय बोलावे हे त्याला सुचत नव्हतं.मनात अनेक विचारांचं काहूर माजायच.तिला ही गोष्ट पसंत पडणार की नाही,तिच्याशी नात तुटलं तर काय होईल अशा अनेक विचारांचं वादळ त्याच्या डोक्याची भंबेरी उडवत होत.परंतु त्याला राहवल्याही जात नव्हते. म्हणून खूप हिम्मत करुन एके दिवशी त्याने तिच्याकडे मन मोकळं केलंच व आपलं प्रेम व्यक्त करून कुठल्यातरी जाळ्यातून मुक्त झाल्यासारखं त्याला वाटत होतं.ती काय प्रतिसाद देईल,ती हे नातं स्वीकारणार की नाही,की इथेच या नात्याला फुल स्टॉप लागेल अशी भीती नकुल ला खात होती.परंतु तस काही झालं नाही.उलट त्याला सुखद आणि गोड धक्का त्याला देत नेहानेही ते प्रेम आणि सगळं काही स्वीकार केलं.त्यावेळेस तर नकुल ची अवस्था बघण्यालायक होती.जंगली चित्रपटातील शम्मी कपूर साहेबांचं गाणं आहे न कोई मुझे जंगली कहे त्यामध्ये जसे शम्मी कपूर साहेब बर्फाच्या पांढऱ्या चादरीवर कलाटन्या मारतात तसे याला ही नक्कीच तसच काहीतरी कराव वाटत असणार अशी त्याची अवस्था होती.जमिनीवर त्याचे जणू पायच थांबत नव्हते.अगदी इतका तो आनंदी आणि उत्साही दिसत होता.नकुल पाहायला सावळा आहे परंतु चेहऱ्यावरील त्याच ते तेज कोणालाही आकर्षित करण्यासाठी पुरेस आहे.मग नेहा तर नक्कीच त्याच्याकडे आकर्षित होणार होतीच.दोघांनी प्रेमाचा स्वीकार केल्यावर सगळं काही नीट चाललेलं होत.परंतु नेहाच्या मनात काहीतरी वेगळंच वादळ होत.तिच्या अतीत च.हो नकुल च्या आधी भूतकाळाच्या डोहात उडी मारली तर तीच एक जून रिलेशनशिप होत जे कायमच आता संपलेलं होत व नकुलसोबतचा तिचा प्रवास सुरु झाला होता.परंतु तिला ही गोष्ट नकुल ला सांगायची होती.त्याच्याकडून काहीही लपवून ठेवायची इच्छा तिची नव्हती.म्हणून तीच मन कासावीस होत होत.शेवटी तिने निश्चय केलाच की आपण सर्वकाही नकुल ला सांगून टाकूयात.मन मोकळं करून घ्यायचं.नकुल ला आपण कुठल्याही गोष्टींपासून परदा नाही करायचा.तेव्हा तिने एकेदिवशी नकुल ला सांगून टाकले व मोकळी झाली.परंतु नकुल ला याचा कुठलाही परिणाम होणार नव्हता.कारण त्याने मोकळ्या मनाने तिचा सर्व गोष्टी सोबत तिचा स्वीकार केला होता.प्रपोज करताना त्याने हा विचार नव्हता केला की नेहा च आधी पण कुठलं रिलेशनशिप होत मग मी का तिच्यावर प्रेम करायला हवे असा कुत्सित आणि तुटपुंज्या विचारांचं नकुल नाही हे त्याने नेहा ला स्वीकार करताना सिद्ध केलं होतं.म्हणून त्याच्यावर या गोष्टींचा कुठलाही परिणाम होणार नव्हताच.उलट एक अभिमान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता कि व्व्वा मला एक प्रामाणिक सोबती नेहाच्या रुपात भेटला आहे म्हणून.नेहलाही या गोष्टींचा अभिमान वाटला असेलच की तिलाही तीच सर्वस्व स्वीकारून आपल्याला एक निस्सीम प्रेम करणारा साथीदार मिळाला आहे म्हणून.
आता नंतर काय???याच प्रश्नाचं कोड नेहा कडून सुटत नव्हतं.तिच्या घरचे या नात्याला स्वीकार करणार की नाहीत?काय म्हणतील ते?काय होईल आपल्या या प्रेमाच्या नात्याचं?असे अनेक प्रश्न नेहा च्या मनात उदभवत होते.आपल्यामुळे किंवा आपल्या घरचयांमुळे नकुल ला काही त्रास नको व्हायला याची काळजी सतत नेहा ला होत होती.याच गोष्टींची चिंता तिला खात होती.तेव्हा नकुल ने तिला समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता की काही नाही होणार तू फक्त धीर धर व आपल्या प्रेमासाठी आपल्या नात्यासाठी तटस्थ राहा.मी तुझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी सगळ्या जगाशी लढायला तयार आहे.आणि नकुल आहे पण तसाच.त्याला त्याची एखादी मनपसंत व्यक्ती असो वा एखादी वस्तू असो ती तिला हसिल करतो म्हणजे करतोच एवढा हिम्मतवाला आमचा नकुल आहेच.तेव्हा मग हे तर त्याच प्रेम आहे.त्याच्या प्रेमासाठी तर तो काहीही आणि कुठल्याही थराला जाण्याची हिम्मत तो ठेवतो.तो तिला यावर धीर देत होता व समजूत काढत होता.परंतु नेहा ला त्याची खूप चिंता होत होती म्हणून ती थोडी घाबरून होती म्हणून त्यांचं थोडं बोलणंही कमी झालं होतं.नकुल ला काहीतरी त्रास होईल या विचाराने ती एक पाऊल मागे घेण्याचा विचार करत होती.
परंतु तिने सोबत हा पण विचार करायला हवा कि आपल्या सरस्वासोबत स्वीकार करणारी ही व्यक्ती जर आपण गमावली तर परत आपल्याला एवढं प्रेम करणार कोणी नाही भेटणार.जो सर्व जगासोबत आपल्यासाठी भिडण्याची तयारी दाखवतो ती व्यक्ती जर गमावली तर परत नाही मिळणार.खूप क्वचितच काही भाग्यवान लोक असतात अशी ज्यांना असा सोबती भेटतो.
म्हणून अस वाटते नेहा पण नक्कीच हा विचार करेल.तिचंही मन तिला म्हणेल की’काय करत आहेस नेहा तू समोरची भीती मनात ठेवून हातातील प्रेम गमवायला निघालीस.खूप भाग्यवान आहेस तू की नकुल सारखा तुझ्यासाठी भिडणारा सोबती भेटला आहे,तुझ्या मागचा पुढचा कशाचाही विचार न करता मोकळ्या मनाने तुझ्यावर प्रेम करणारा सोबती भेटला आहे तुला.मग एवढी भीती कशाची आहे तुला.निडर हो,सक्षम हो एक सक्षम जोडीदार जो कोणाला भेटत नाही तो तुला भेटला आहे.
मग कशाची भीती बाळगते,घे एक पाऊल पुढे तू पण,आणि आपलं प्रेम मिळवा.संकट आणि त्रास तर प्रत्येकाला आहेच मग त्यांची भीती बाळगून कोणी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो का???नाही नेहा नाही उलट हिम्मत करून आणि जगाशी भिडून तिला मिळवण्यासाठी धडपड आपण करायला पाहिजे.म्हणून नेहा तू पण उठ आणि कशाची ही भीती न बाळगता लढ आपल्या प्रेमासाठी,भीड अकख्या दुनियेशी.आभाळा एवढं प्रेम करणारा साथीदार मिळाला आहे तुला तू पण तेवढंच त्याच्या पदरात टाक,त्याहीपेक्षा जास्तच तू करायला हवं……भीड नेहा भीड,मिळव आपलं प्रेम….
ही नकुल आणि नेहा ची कहाणी काल्पनिक नसून पूर्णपणे वास्तववादी आहे.म्हणून बघू पुढे नेहा आणि नकुल च काय होते तर…….तोपर्यंत तुम्ही पण आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी धडपड करा आणि आपल्या सोबत्यासोबत जीवनाचा आनंद घ्या..
✍🏻शुभम सिरसाठ✍🏻
9405301614
माझी चशमिश
चशमिशशी फोनवर काय बोलावं हे सुचतच नाही,ती पण काही बोलत नाही तीच मी समजू शकतो कारण तिच्या मनात तस काही नाहीच,ती सरळ जे काही आहे सांगून देते व मोकळी होऊन जाते मी मात्र कोड्यात पडल्या सारखा होऊन जातो.तिने खूप काही बोलावं माझ्याशी मला असं वाटते,कधी तर कल्पना येते की एकदिवस तरी ती स्वीकार करेल आणि कडकडून मला घट्ट उबदार मिठीत मला घेईल.पण ती मात्र कल्पनाच.ती आहे तशी आहे हे मला माहित आहेच तिची आणखी प्रशंसा करणे म्हणजे चंद्रालाच आरसा दाखवण्यासारखं होईल.तिच्या आठवणींचे ढग सतत माझ्या मनाच्या पटलावर राज्य करतात पण तिला कस सांगू आणि काय बोलू तेच कळत नाही मला.एरव्ही एवढं शब्दांचं जाळ विणतो मी परंतु तिच्याशी बोलयची वेळ आली की अगदी निःशब्द होऊन जातो.
✍🏻चशमिश✍🏻
महिला सबलीकरण
।स्त्री।
🇮🇳 भारत माता कि जय🇮🇳
लिहिलेल्या पहिल्याच ओळीत आपण आपल्या देशाला,आपल्या मातृभूमीला मातेचा दर्जा देतो तिथे खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीचे दिव्य दर्शन दिसून येते.परंतु प्रश्न हा आहे कि खरंच आपल्या देशातील माता-भगिनींचा दर्जा हा आज सुधारला आहे का,कि समाजाने निर्माण केलेल्या काही प्रथा-परंपरांमध्ये अडकून बसला आहे.खर तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्या आजच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच दिसून येते.
आजही काही प्रमाणात लोकांची वृत्ती ही स्त्रीयांनी चूल आणि मूल ही एवढीच जबाबदारी सांभाळावी आणि गप्प बसावे अशीच आहे,ना तिने घरातील कुठल्या व्यवहारांमध्ये तोंड घालावे,ना त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी धारणा त्यांच्या मानसिकतेमध्ये बनलेली आहे.आजही पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये महिलांशी किंवा तरुण मुलींशी बोलताना कुठे कुठे हा अहंकार पुरुषांच्या बोलण्यातून दिसून येतो कि’ए मी का घाबरतो का तुला,मी काही तुझ्यासारख्या बांगड्या नाही भरल्यात हातामध्ये’ही वृत्ती पावलो पावली आजही मोठ्या प्रमाणात दिसून येते.काही समाजांना तर स्त्रियांचा वाढता व्यक्तिमत्व विकास हा त्यांच्या डोळ्यात खुपतो, जर स्त्रीने किंवा मुलीने पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व मिळवण्याचा जरी प्रयत्न केला तर यांचा पुरुषी अहंकार लगेच आडवा येऊन वेगवेगळी बंधन तयार करून त्यामध्ये स्त्रियांना बांधन्याचा प्रयत्न होतो.जेव्हा स्त्रियांना म्हणतात कि ए मी का घाबरतो का,मी काही बांगड्या नाही घातल्या म्हणजे आपण किती मर्दानगी आणि पराक्रमाची भाषा बोलत आहे असं स्वतःला वाटते,पण खरं तर या भाषेमध्ये पण हा स्त्रियांचा अपमानच आहे,कारण बांगड्या घालणे हे स्त्रीच काम आहे व ही स्त्री म्हणजे दुबळेपणाच आहे,तिला दुबळी ठरवण्यात येते.कुठे तर आजही हुंडा प्रथा ही आहेच,आणि त्याची बळी ही आपली मुलगी,स्त्रीच होते.हुंडा देऊन ही सासरी गेल्यावरही तिच्या वाटेला येणारे काही अपमान आणि गलिच्छ भाषा ही काही संपत नाही,तिच्या आईवडिलांच्या विषयी बोल्ल जात,हेच शिकवलं का तुझ्या आईवडीलांनी वगैरे वगैरे असे कितीतरी शोषण होते.ज्या घरात मुलगी जन्माला येते तिथेही म्हणतात कि मुलगी म्हणजे परक्या घराची संपत्ती,आणि ज्या घरात ती सुण म्हणून जाते तिथेही तिला म्हणतात कि ही तर परक्या घरची आहे मग मुलीच घर कोणतं आहे.अरे तिला परकच समजतो तर तीच अस्तित्व तरी कुठे आहे,तीच घर कोणतं आहे.समाजाने निर्माण केलेल्या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीच अस्तित्व हरवून जाताना दिसते तेव्हा मला सावित्रीबाई फुले डोळ्यासमोर दिसतात,मला आनंदीबाई जोशी दिसतात,मला मदर टेरेसा दिसतात,मला शिवाजी आणि संभाजी घडवणारी राजमाता जिजाई दिसतात,मला सिंधुताई सपकाळ दिसतात,मला ती कल्पना चावला दिसते,मला सुनीता विलीयम्सन दिसते,मला आजची देशाची निर्मला सीतारामन दिसते,मला सुषमा स्वराज दिसते,मला रमाबाई आंबेडकर दिसते अशा कितीतरी स्त्री शक्तीचे उदाहरण मला दिसतात जे पुरुषप्रधान समाजव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन यांनी असामान्य कीर्ती आपल्या देशात गाजविली आणि देशाचं किर्तीमान उंच केलं आहे.यांच्याही वाटयाला कुठेतरी अवहेलना आल्याच असतील त्या सर्वांच्यावर मात करून स्त्री सबलीकरण(womens empowerment)ची उदाहरण स्वतः बनलेली आहेत.आजही यशाची शिखर गाठताना आपल्या मुलींना कौतुकाची थाप न येता त्यांच्या वाटेल पावलो पावली घाण नजरा,व त्या नजरेने होणारे उघडे बलात्कार येतात हीच समाजासाठी शरमेची गोष्ट आहे.त्यांचा सारसपणा आपल्याला सहन होत नाही,रस्त्यावर जाताना एखाद्या मुलीने आपल्याला मोटरसायकलला ओव्हर टेक जरी केल तरी आपल्या पुरुषी अहंकार ला जसा धक्काच पोहोचतो व म्हणतो अरेच्चा माझ्यासोर गेली ही,एवढी हिची हिम्मत आणि लगेच आपल्या वाहनांची गती वाढवून तिच्या समोर जाऊन तिला मागे वळून बघतो तेव्हा जस याने खूप मोठा पराक्रमच केला आहे अशी भावना त्याला येते.हीच हीन भावना मुलीविषयी,प्रगत स्त्रीविषयी आहे म्हणून आजही कुठलीच मुलगी रसत्यावर जाताना असे म्हणूच शकत नाही कि मी सुरक्षित आहे म्हणून,करण त्यांच्याकडे बघणारा दृष्टिकोन आणि घाण नजरा यांच्या कैदेत त्या आजही अडकूनच पडलेल्या आहेत.स्त्रीचा सर्वात दुबळा विषय म्हणजे हे तीच चारित्र्य होय,तिला तिच्या चारित्र्यावरून नेहमी गुलामगिरीत ठेऊन,धाकात ठेवून वाट्टेल त्या गोष्टी करून घेणे आणि जर नाहीच केल्या तर चारित्र्याचा धाक देऊन तिला तिच्या जागेवर आणणे ही समाजाची हीन बुद्धी करत आली आहे,आणि समाज म्हणजे काही विशिष्ट अशी एखादी जात,धर्म,नाही तर समाज हा आपण बनविलेल्या काही प्रथा आणि अन्याय ज्याचे आपण समर्थन करतो ती लोक म्हणजे तो समाज होय.चारित्र्यावरून धाकात ठेऊन तिला तीच पावित्र्य सिद्ध करावे लागते हे आपल्या सीतामाईला पण करावं लागलं,कि तू अमुक वर्ष रावणाच्या कैदेत होती म्हणून तू तुझं पावित्र्य, तुझं पातिव्रत्य शुद्ध आहे की नाही म्हणून तुला अग्निदिव्य करावं लागेल.जर सीतामतेला हे सर्व करावं लागलं तर हा समाज आजच्या स्त्री कसा काय सोडेल?
आजही स्त्रीच्या हक्कांचा प्रश्न हा समोर आला कि तिची योग्यता आहे का हा प्रश्न निर्माण केल्या जातो,पण खर तर आपल्या देशातील स्त्रिया या स्वतंत्र लढ्यात पण पुरुषांशी समानता ठेऊन लढल्या तेव्हा मला सरोजिनी नायडू पण आठवतात, मला विजयालक्ष्मी पंडित पण आठवतात,मला भगतसिंग ला सुखरूप वाचवणारी दुर्गा भाभी पण आठवते तेव्हा लक्षात येते कि भारताच्या स्वातंत्र्य संग्राममध्ये पुरुषांनी जेवढे कष्ट घेतले तेवढे स्त्रियांचाही वाटा हा आहेच.मग तरीही स्त्रीच्या प्रगतीकडे बघून आपण का कमीपणा समजतो याच कारण मला आजही स्पष्ट नाहीं, त्यांचा वरचढपणा हा आज अपल्याला सलतो आहे,मी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीमध्ये वेगळ्या वेगळ्या विभागांमध्ये स्त्रिया या सर्वोच्च स्थानी दिसतात व त्यांचं नेतृत्व ही तेवढच प्रभावशाली आहे,तेव्हा नक्कीच दिसून येते कि कमीपणा हा त्यांच्या नेतृत्वगुणमध्ये नाही तर आपल्या पुरुषी दृष्टिकोनात आहे.मागील काही काळात मुलगा हवा की मुलगी हवी हा विषय घरांमध्ये दिसायचा,आणि मुलगाच वंश वाढावा म्हणून मुलगाच हवा म्हणून हॉस्पिटल मध्ये जाऊन मुलगा आहे की मुलगी हवी हे तपासून घेत होते,आणि जर मुलगी असेल तर तिची गर्भातच हत्या करणे असे घाणेरडे प्रकार हे आधुनिक समाजामध्ये पण पाहायला मिळाले आहेत,जर प्रत्येक मुलीला असे गर्भातच मारण्यात येत असेल तर कुठली वंश वाढीची गोष्ट आपण करत आहो हा साधा विचार पण आपण करत नाही,फक्त मुलंच जन्माला घालावीत आणि मुलींची हत्या करावी याने कोण्या वंशाची वाढ होईल,फक्त पुरुषी समाज निर्माण होणार यातून हे आपल्या कुत्सित बुद्धीला का समजत नाही हीच मोठी आधुनिक समाजाची शोकांतिका आहे.
शासनाच्या काही योजना राबविण्यात आल्या त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या या आळा घालण्यात आला हे एक सुदैव म्हणावे लागेल,”बेटी धन कि पेटी”,”बेटी बचाओ,बेटी पाढाओ”या योजना फार कार्यक्षम ठरल्या आहेत त्यामुळे आज त्यांचं अस्तित्व सुधारण्यास सुरवात झालेली आहे हे दिसून येते.मानवाचे जेवढे विकासाचे अग्रक्रम आहेत तेच स्त्रीचेही आहेत ते म्हणजे साक्षरता आणि प्राथमिक शिक्षा.
जर एका पुरुषाला साक्षर केलं तर एक व्यक्ती साक्षर होते आणि जर एखाद्या स्त्रीला साक्षर केलं तर एक संपूर्ण कुटुंब साक्षर होते म्हणून आपण म्हणतो कि शिकलेली आई घर पुढे नेई.आणि यामध्ये कुठलाही पुरुषी अहंकार आडवा येण्याचं काहीच कारण नाही,तर उलट जीवनाचा दृष्टिकोन उंच ठेऊन स्त्रियांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्यासोबत त्यांचाही विकास आणि प्रगती हे आपल्या सोबत व्हावी ही एक नवी संकल्पना आपल्याला निर्माण करायची आहे.आपण आपले संकुचित अहंकार आणि चुकीच्या संकल्पना दूर ठेऊन आपल्यासोबत स्त्रियांची वाटचाल ही सारखीच व्हावी म्हणून आपण आज त्यासाठी सशक्त होणे गरजेचे आहे.खरं तर समाजामध्ये स्त्रीची उपस्थिती ही संस्कृतीच आणि शालीनतेच तसेच सौन्दर्याच प्रतीक असते.स्त्री ही सौन्दर्याच,मांगल्याचे, सुसंस्कृततेचे प्रतीक मानल्या जाते.
आपल्याला अभिमान बाळगायला पाहिजे कि देशात आणि जगात सर्वात आधी लैंगिक शिक्षण आणि कुटुंब नियोजनाची गरज आहे म्हणून आपल्या मालती बाई कर्वे यांनी केली आणि त्यांचे पती राधो कर्वे यांनी केली.
म्हणून आज आपल्या समाजातील स्त्रीकडे बघण्यात येणारे दृष्टिकोन आणि कुत्सित प्रथा-परंपरा यामध्ये अडकून ठेवणाऱ्या संकल्पना यातून बाहेर काढून त्यांना सन्मानाने समान वागणूक आणि हक्क देऊन सोबत वाटचाल करून सशक्त भारत आणि सशक्त समाज निर्माण करण्याची गरज आपल्याला आहे.
तुमच्या यशात ती आनंद घेते,पण आनंदाच्या भरात तुम्ही तिचा उल्लेख सुद्धा करत नाही,तीच अस्तित्व सुंदर आहे परंतु आपल्याला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती माणूस आहे,ती आई आहे,ती बहीण आहे,ती मैत्रीण आहे,ती प्रेयसी आहे,ती पत्नी आहे,पण तुम्ही तिला फक्त आणि फक्त मादी समजता परंतु लक्षात ठेवा ती काली पण आहे,ती जगदंबा पण आहे……..🙏
शुभम रा.सिरसाठ
दर्यापूर,अमरावती
महासत्ता
वाटचाल महासत्तेची
आज साऱ्या जगाच लक्ष हे भारतावर लागून आहे,ज्या दिशेने आज आपला देश वाटचाल आणि प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे त्यामुळे जगातील सर्वच मोठ्या देशांना एक चुणुक लागलेली आहे कि भारत हा लवकरच महासत्ता होण्याच्या तयारित आहे.कारण सर्वांना हे माहित आहे कि सर्व गोष्टिन्नी संपन्न असे दोन राष्ट्र आहेत ते म्हणजे आशियातील भारत आणि चीन.
आणि चीन तर हा आधीच या कामगिरिसाठी सज्ज झालेला आहे,आणि चीन ला पण हे अगदी चांगल्या प्रकारे माहित आहे कि आपल्या या स्पर्धेमधे फ़क्त भारत आपल्याला पछाडु शकते.त्याचे कारणही तसेच आहे,सर्व जगामधे भारताला हजारो वर्षांची संस्कृति लाभलेली आहे,क्षेत्रफळमधे पण मोठा,लोकसंखेच्या बाबतीत देश मोठा,आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था पण आज भारताची आहे,सैन्यबळ पण आज मजबूत झालेले आहे,तसेच जीडीपी दर पण आज आपला वाढलेला आहे,इज ऑफ़ डूइंग बिज़नेस हा किताब आपल्याला मिळालेला आहे.या सर्व गोष्टीनमधे महत्वाची बाब म्हणजे न्यूक्लियर पॉवर,मजबूत सैन्यबळ, आणि आता तर अंतरिक्ष शक्ति पण आपण प्राप्त केलेली आहे,आज अमेरिका आणि चीन नंतर भारत ही कामगिरी करणारा देश झालेला आहे.आज भारताच्या वाढत्या प्रभुत्वाला चीन हे सहन करु शकत नाही म्हणून यावर दबाव आणि कमजोर करण्यासाठी चीन ने पाकिस्तान ला मदत करायची खेळी केली आहे,कारण’दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है’याच गोष्टीचा फायदा घेऊन पाकिस्तान ला मदत आणि मैत्रिचा हाथ पुढे केला आहे,त्यामुळे देशाला आजपर्यंत प्रचंड अशी झळ बसलेली आहे त्यामधे आतंकवाद हा सर्वात मोठा प्रश्न आज आपल्यासमोर आहे,इकडून भारतात घूसखोरी करून बॉम्बस्फोट आणि हल्ले करून देशाला दुबळ करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे तर दूसरी कडून सीमोल्लंघन करून आपल्या जमीनी गिळंकृत करण्याच काम चीन करत आलेल आहे.चीन ने आपल्याला सर्वात मोठी जखम तर 19 ऑक्टोबर1962 लाच दिली जेव्हा मैकमोहन रेषा पार करून आपल्या सैन्यावर हल्ले केले.चीन च हे दुसऱ्यांचे प्रदेश बळकावने आणि आपला अधिकार त्यावर गाजवने हे त्यांचं धोरण तर तेव्हाच बनल जेव्हा त्यांनी तिबेट वर ताबा मिळवून तिबेट हा आमचा अविभाज्य भाग आहे असे जगाला सांगण्यास सुरवात केली,तर चीन ला आपला सर्वकालीन मित्र म्हणणाऱ्या पाकिस्तान ने तर विवादास्पद असलेला भाग म्हणजे कश्मीर मधील ज्याला आज पूर्व उत्तर मधील ‘अक्साई चीन’असे म्हणतात तो चीन ला देणगी म्हणून देऊन टाकला.आणि त्यांनी थेट भारताच्या सिमेपर्यंत येतील असे सिक्स लेन चे हाइवे बनवले व्यापार करण्यासाठी,परंतु ते त्यांचे राणगाड़े, आणि सैन्य थेट भारतीय सिमेवर हल्ल्ला करतील असाच उद्देश्य ते डोळ्यासमोर ठेऊन आहेत.तर हे असे दोन शेजारी आपल्याला कमजोर करण्यासाठी उभे आहेत तर दुसरीकडे आपल्या देशातील काही अहंकारी आणि देशद्रोहाला समर्थन करणारी विचारांची टोळी या देशात आहे जी जातीय वादाच विष कालवून सर्वत्र पसरवत आहे.कारण जवळ जवळ सत्तर वर्ष सत्तेचा उपभोग घेऊन अचानक कोणी तरि येऊन आपल्याला लाथ मारून आपल्याला पायउतार केल व एक मजबूत सरकार हे स्वाबळावर बहुमताने बनल व आज देशाची मान उंचावत देशाला समोर घेऊन जात आहे.हे सर्व यांना सहन होत नाही म्हणून काहीतरी नवीन करून जाती वादाचा फायदा घेऊन खोट खोट काहीतरी पसरविने, नविन नविन मुद्दे तैयार करून जानतेत भ्रम तयार करणे अशा गोष्टी चालू केल्या त्यामधे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे,बिहार च्या विधानसभा निवडणुकी च्या वेळी एक नविन मुद्दा घेतला तो म्हणजे ‘संविधान धोके में है’,आरक्षण निकाला जाएगा,म्हणजे आरक्षण असणाऱ्या समाजाला वोटबैंक साठी त्यांचा वापर करणे एवढं त्यांचा उद्देश होता,परंतु तो पण अयशस्वि होऊन युतीची सरकार तिथे बनली नितीश कुमार ची,आणि हे सर्व संपल्यावर तो मुद्दा पण बंद पडला, नंतर विद्यापीठच्या आवारात’भारत तेरे टुकड़े टुकड़े होंगे’असे काही देशद्रोही गैंग तैयार झाल्या,नंतर आपल्या संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु त्याच्या समर्थनार्थ आपल्याच देशात ‘अफजल हम शर्मिंदा है के तेरे कातिल अभीतक जिन्दा है’चे नारे लावनारी गैंग आली.तसेच अवार्ड वापसी गैंग तयार झाली त्यानंतर ज्या देशाने ज्यांना जेवढ मोठ बनवले जो सन्मान दिला त्याच देशात काही लोकांना भीति वाटायला सुरवात झाली आणि त्यामधुन असहिष्णु गैंग चा जन्म झाला,त्यानंतर आता देशाच सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ने पण क्लीन चिट देऊन राफेल डील चा मुद्दा एकदम लीगल आहे म्हणून मंजूरी दिली त्यामधे पण राफेल डील ही एक घोटाळा आहे म्हणून कितीतरी खोट पसरवण्याच काम करण्यात आल,लण्डन मधे जाऊन सर्व जगाच्या समोर आपल्या देशाचे आणि सेनेचे ढिंदोड़े काढ़न्याच काम केल गेल ज्याने देशाची मान खाली झुकेल असेच कृत्य गेल्या 4 वर्षात करण्यात आल परंतु तरीही मोदी सरकारने आपली जबाबदारी ही अगदी चोख बजावुन आज भारताला सर्व जगासमोर एक मजबूत बनवले आणि देशाचा मान ही उंचावला.आशा सर्व सरकार ला दुबळ बनवताना पण सरकारने एक संतुलित कामगिरी केली, देशात सर्वांचे आरक्षण सुरक्षीत ठेऊन ज्यांना आरक्षण नव्हते त्यांना पण दिल,देशात स्किल इंडिया ला चालना देऊन सर्वांना स्वयंरोजगार बनवन्याच प्रयत्न चालू आहे,भारताला इकोनोमिकल स्ट्रांग करण्यात देशाला यश आल,जगातील मोठ मोठी राष्ट्रे आज भारताच्या बाजूने अभी आहेत,खर तर हीच एक महासत्ता होण्याची सुरवात असू शकते,आज आपल्या देशाविषयी विचार करण्याची सुरवात ही बऱ्याच तरुण पीढित उतपन्न झालेली आहे,देशाच्या विकासात स्वतः पुढाकार घेणार्यांची संख्या वाढलेली आहे ते आपल्या परिने कशीही असो पण एक देशासाठी जागरूकता निर्माण झालेली आहे.तर आपल्याला विचार करावा लागेल कि असे सरकार निवड़ावे कि ज्याचा आनंद चीन आणि पाकिस्तान होईल,देशद्रोही लोकांना होईल.कि असे सरकार निवड़ावे जे आपल्याला एक मजबूत देश आणि महासत्तेकड़े घेऊन जाईल, जी सर्वत्र आपला विकास घडवून आनेल. आपल्याला नक्कीच विचार आपल्या देशाचा करावा लागेल.आतंकवादला चोख उत्तर देणार सरकार आपल्याला पाहिजे,लाचार होऊन त्यांचे हल्ले सहन करून यूनाइटेड नेशन मधे आपले गारह्हनी सांगत बसणारि पाहिजे याचा पण विचार आपल्याला करावा लागेल.चीन ने कितीही घूसखोरी केली तरीही हिंदी-चीनी भाई भाई म्हणून त्यांना आपल्या जमीनी बळकावु द्यायच्या कि थेट त्यांच्या सिमेवर आपल सैन्य आणि एयर फ़ोर्स ची तयारी लावून ठेवणारी सरकार हवी. शेवटी आपल्या देशाच आणि आपल अस्तित्व है आपल्याच हातात आहे.
सबका साथ,सबका विकास याचा विचार करून आपल्या देशाच्या समर्थनार्थ आपण आता सक्रीय होऊयात.
🇮🇳जय हिंद जय भारत🇮🇳
शुभम रा.सिरसाठ
अमरावती 9405301614,7020821845
लग्न
✍🏻माझी चशमिश✍🏻
मित्राच्या लग्नाला जायचा योग आला असता मी फक्त त्याच्या वरातीच्या संध्येलाच जाऊ शकलो,लग्न म्हटलं की बँड किंवा डिजे ची हौस हे असतेच.त्यामध्ये मलाही नाचायचा ऊर हा चांगलाच भरून आला होता,त्याला कारणही तसेच आहे कारण एक दीड वर्षानंतर मी कोणाच्या तरी लग्नात किंवा समारंभात शामिल होणार होतो त्यामुळे डिजे च्या तालावर माझे पाय आणि अंग हे नियंत्रणाच्या बाहेर गेले होते.पाहुने मंडळी भरपूर होती,त्यामध्ये बरेच अनोळखी होते माझ्यासाठी,बऱ्याच मुली आणि पाहुणे हे डिजे च्या तालावर थिरकत होते व ठुमके लावण्याचा प्रयत्न जरा जास्तच करत होते.अचानक माझी भिरभिरती नजर एका अनोळखी चेहऱ्यावर पडली,तिचा तो गोल गोल चेहरा,ते मृगनयनी डोळे,बदामी लाल लाल ओठ व डोळ्यांवर चष्मा चढवलेली ती गोड चशमिश मला भारावून सोडत होती.मी नाचत जरी सर्वांच्या गर्दीत होतो पण माझे हुरहूरते डोळे तिलाच बघून शांत होत होते,एक जिज्ञासा निर्माण झाली होती की इथे एवढ्या सुंदर मुली असूनही मला ही चशमिश स्वतःकडे खेचून का घेत आहे?का माझे डोळे हिच्यावरच थांबत आहेत?प्रश्नांचे थैमान आणि विचारांचे काहूर माझ्या मनाची नाचक्की करत असतानाच तो अनोळखी चेहरा कुठेतरी अदृश्य झाला व माझं मन अस्वस्थ व्हायला लागले.कोण आहे ही,का माझं मन हिच्याकडे जात आहे,का माझे डोळे फक्त हिलाच शोधतात?माझे पाय आणि अंग डिजे च्या तालावर ठेका घेत होते पण मन आणि डोळे त्या चशमिश ला शोधत होते.बराच वेळ होऊन गेला होता तरी ती दिसत नव्हती.अचानक नाचून नाचून पोटामध्ये कळा येऊ लागल्या होत्या म्हणून थोडा विश्रांती घेण्यासाठी बाजूच्या खुर्चीवर बसलो तेव्हा अचानक तिचा तो मंदधुंद करणारा गोल गोल चेहरा बाजूच्या सोफयावर बसलेल्या अनेक स्त्रियांमध्ये मला शोभून दिसत होता.तिला बघताक्षणी माझ्या सर्व वेदना जशा होत्याच्या नव्हत्या झाल्या व पुन्हा जोमाने उठून मी नाचायला लागलो.परंतु मनात आणखी एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे पुढे काय?कस बोलायचे हिच्याशी,काय म्हणून बोलावे,का मनात येणारे विचार मोकळे करून घ्यावे तिच्यासमोर?पण ती का स्वीकार करेल या सर्व गोष्टी?मी माझ्या मनातील शब्दाचे जाळे तिच्यासमोर विणले तर म्हणेल की चल निघ इथून असे फिल्मी डायलॉग मारणारे खूप बघितले मी.पण मी तिला कस समजावू की मी खरच प्रेम करायला लागलो तिच्यावर…..😔😔हो ते प्रेमच होत.कोणी म्हणेल छे छे हे प्रेम वगैरे काही नसतं पण माझ्याबाबतीत ही गोष्ट घडत होती,ते पहिल्या पाहनीतील एकतर्फा प्रेम होतं.पण एवढ्या साऱ्या पाहुनेमंडळी मध्ये कस बोलायचं,ती माझ्यासाठी अनोळखी,मी तिच्यासाठी अनोळखी,पण मी प्रयत्न केलाही असता बोलायचा तर तिने तरी का माझ्याशी बोलावं हा प्रश्न मला खात होता.शेवटी सर्वांचा डान्स आणि धमाल आटोपली होती,मलाही घरी जायचे होते पण तिचा विरह सहन होण्यासारखा नव्हता,कारण मी लग्नाला जाणार नव्हतो सकाळीच अमरावती ला आपल्या ऑफिस ला जायचे होते मला त्यामुळे मला ही गोष्ट खूप अस्वस्थ करत होती.शेवटी तिला शेवटचं मन भरून बघून घरी आलो फ्रेश होऊन बेडवर पडलो पण झोप येत नव्हती,त्या चशमिश चा गोल चेहरा मला झोपुही देत नव्हता.कारण ती माझ्यासाठी लाखोंच्या गर्दीमध्ये कोणीतरी आपलं भेटावं व मनाला एक शांती आणि उत्सुकता लाभावी अशी ती होती.पंजाबी सूट तिला फारच छान दिसत होता.खूप शांत वाटत होती ती डान्स करत नव्हती तिथे.का डान्स करत नव्हती,एवढी शांत का बसली होती?????ती ती आणि फक्त तीच माझ्या मनात होती तिचा विचार करत असतानाच एक वीज मनाच्या गाभाऱ्यावर चमकून गेली की तीला जर मनातील भावना सांगूनही टाकल्या तर तिने नाही म्हटलं तर,किंवा तिच्या जीवनामध्ये कोणी दुसरं असेल तर,या जर तर च्या गोष्टी मला फारच चीड आणत होत्या.तिच्या या विचारातच मला केव्हा झोप लागली कळलेही नाही.सकाळी झोप उघडली ती तिच्याच आठवणीने,पण सकाळी सकाळी उठल्यावर माझं मन मला खायला करत होते कारण मला जायचं होतं आणि तिला मी कधी भेटणारही नव्हतो,मनातील सर्व गोष्टी मनात राहणार होत्या आणि ती एका स्वप्नातील परीसारखी माझ्या जीवनातून कायमची अदृश्य होणार होती.पण आयुष्यात तिला परत मिळवण्याची आस बाळगून मी घरातून निघालो होतो.ती मला मिळेल ही आशा ठेवून एक आशावादी दृष्टीकोन तिच्यासाठी मनात अजूनही बाळगून आहे.बघुयात आम्ही दोघे कधी भेटणार की नाही की एक फक्त कल्पनाच बनून राहू???????परंतु त्या रात्री न घरी जाताना एक एकोणिसशे साठच्या दशकातील गाणं मला खूप प्रेरित करत होत तिला भेटण्यासाठी ते म्हणजे”लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो,शायद कभी फिर इस जनम मुलाकात हो न हो”हाच प्रश्न माझ्या मनाला मी रोज विचारतो कि या जन्मी आमची भेट होणार की नाही,ती आमच्या भेटीची रात्र कधी येणार की नाही की फक्त कल्पनाच बनून राहू?प्रतिक्षा फक्त तिची.!!!@
✍🏻 !शुभु!✍🏻
ती आणि मी
अमरावतीच्या CCD कॅफे मध्ये आमचं भेटायचं ठरलं होतं.तसा मी येऊन पाच मिनिटे आधीच वाट बघत सोफ्यावर बसलो होतो.तेवढ्यात ती समोरून काचेच्या दरवाज्यातून येताना दिसली.एम्ब्रॉयडरी केलेला तो पांढरा शुभ्र कुर्ता अन डार्क ब्ल्यू जीन्स,एका हातात जाड रिस्ट वॉच अन दुसऱ्या हातात’ड्रीम्स’नाव गुम्फलेलं बँड,ते नजरबंदी करणारे डोळे अन चेहऱ्यावरच खळखळणार हसु मला खूप आकर्षित करत होते तेव्हा तिच्या सौन्दर्यावरुन वरून मला वाटलं कि माझी विकेट नो बॉल वर पडणार आणि ती
मॅच मी न खेळताच हरलो।
बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता हा एक खर बघितल्यास गंभीर प्रश्न आहे
जीवनाच्या प्रवासात आपल्या आयुष्याची इमारत उभी करताना आपण जो मार्ग निवडतो त्या मार्गावर प्रवास करताना आपल्याला जे यश किंवा अपयश येते त्याच खर उत्तर म्हणजे आपण निवडलेल्या दिशेमध्ये दिसून येते।कारण बुद्धिमत्ता ही सर्वांमध्येच असते,अस नाही कि त्याच्यामध्ये आहे आणि या व्यक्तीमध्ये नाही।
त्याआधी जर आपल्याला स्वतःची ओळख झालीच नाही किंवा आपल्यामध्ये काय विशेष आहे याची ओळख आणि जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण आपल्या प्रवासात यशस्वी होऊच शकत नाही।यशाच्या वाटेवरच सर्वात मोठं सत्य म्हणजे स्वतःची ओळख।
अरे तू स्वतःला ओळख आणि मग तुझ्या आवडीचं क्षेत्र निवड त्यामध्ये उत्तम अशी प्रतिभा मिळव त्यामध्ये चांगलं कार्य करून मग स्वतःच्या कीर्तिची ओळख संपूर्ण जगाला दाखव हेच तुझं खर यश।
ही स्वतःची ओळख म्हणजे आपल्या समोर खूप अशी जिवंत उदाहरण आहेत ज्यांच्यापासून आपण आदर्श घेऊ शकतो।मग त्यामध्ये आपण लता दीदी पण आहे,विराट कोहली पण आहे,गायन क्षेत्रातील आज नवीन चेहरा सलमान अली पण आहे।यांनी ज्याप्रकारे आपल्या स्व ला ओळखलं व आपलं क्षेत्र निवडलं त्यामुळे आज त्यांची कीर्ती सर्व जगासमोर झळकत आहे।
जोपर्यंत आपण अपल्यातील स्व ओळखत नाही आणि त्याप्रमाणे त्यावर कार्य करत नाही तोपर्यंत आपल्याकडे कितीही बुद्धिमत्ता असली तरी त्या बुद्धिमत्तेला दिशाहीन बुद्धिमत्ता म्हणता येईल।

प